सूचना व अटी

स्वीकृती

मोबँक हे मोबाईल अँप खेडोपाड्यातून तर तालुका व जिल्ह्यातील सर्वच वयक्तिक माहिती त्वरित मिळावी या उद्देशाने बनविण्यात आली आहे.

खबरदारी

मोबँक मध्ये असलेली व्यावसयीकांची माहिती हि समक्ष भेटून घेतली आहे, तरीही आपण स्वतः पाहून खात्री करून घ्यावी.

बदल

मोबँक मधील काही बदल घडणाऱ्या बाबींचे नवीन अपडेट वेळोवेळी केले जातील. जसे एस .टी. ,रेल्वे वेळापत्रक, अधिकाऱ्यांची बदली यासाठी आम्ही नाव, वेळेत बदल साठच्या अपडेटचे अधिकार राखून ठेवत आहोत.

आवश्यकता

मोबँक साठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे.

पोस्ट केलेल्या जाहिराती

मोबँक मधील जाहिरात किंवा व्यावसायिक मजकुरातील कोणताही दावा आम्ही मान्य करीत नाही.

मंजूरी

मोबँक मध्ये नाशिक शहर, तालुका व सर्वच गावांची माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही कमी असल्यास आपण तशी सूचना करू शकता.

जबाबदारी

मोबँक मधील जाहिरातदाराने आपले पेजचे पासवर्ड सांभाळण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे, आम्ही त्यास जबाबदार राहणार नाही.

दायित्वाच्या मर्यादा

मोबँक जाहिरातदारास तुमचे वैयक्तीक पेज कधीही एडीट करता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

देवाण-घेवाण

मोबँक मधील कुठलीही माहिती आपण लिंक शेअर करून इतरांना देवू शकतो.